गोष्ट दुनियेची - भाग 9: एलियन्स खरंच असतात का? परग्रहावर जीवन शक्य आहे का?

भाग 9: एलियन्स खरंच असतात का? परग्रहावर जीवन शक्य आहे का?

Download भाग 9: एलियन्स खरंच असतात का? परग्रहावर जीवन शक्य आहे का?

25 डिसेंबर 2021 रोजी फ्रेंच गियानाच्या एका स्पेसपोर्टवरून जेम्स वेब नावाची एक महाकाय दुर्बिण अवकाशात झेपावली. ज्या बिगबँगपासून झाली, विश्वाची उत्पत्ती, तेव्हा जन्माला आलेल्या काही अगदी सुरुवातीच्या ताऱ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ही दुर्बिण करणार आहे. तब्बल १० अब्ज डॉलर्सचा खर्च आणि तीस वर्षांच्या संशोधनानंतर तयार झालेली ही दुर्बिण मुळात दूरच्या ग्रहांवर जीवनाची शक्यता पडताळून पाहणार आहे.
त्यामुळे आजवर शास्त्रज्ञांना पडलेला सर्वांत मोठा प्रश्न आता सगळेच विचारू लागलेत... की या संपूर्ण सृष्टीत पृथ्वीच्या शिवाय इतर कुठे जीवन आहे का? आणि जर आहे तर ते कसं आहे?
तर आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, की या शास्त्रज्ञांना एलियन्सना शोधण्यात यश येईल का? आणि पृथ्वीशिवाय दुसऱ्या एखाद्या ग्रहावरही जीवन आहे का?

संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 1st January 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.