गोष्ट दुनियेची - भाग 10: महागाईला आळा घालायला सरकारने काय करावं? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भाग 10: महागाईला आळा घालायला सरकारने काय करावं? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भाग 10: महागाईला आळा घालायला सरकारने काय करावं? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

संपूर्ण जगभरात अन्नाधान्य, तेल, वीज आणि इतर वस्तूंच्या किमती वाढत चालल्या आहेत. अगदी दररोज लागणारा चहाही आता गोड लागत नाही, इतके साखरेचे भावही वधालयेत.
बऱ्याच देशांनी अनेक वर्ष महागाई पाहिलेली नव्हती, पण कोरोनाची साथ फक्त आरोग्याचंच नव्हे तर एक आर्थिक संकटही घेऊन आलीय, जे गेल्या दशकभरात पाहण्यात आलं नव्हतं. महागाईवर नियंत्रण मिळवायला अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी व्याज दर वाढवले. पण ही दुधारी तलवार आहे, आणि यामुळे अर्थव्यवस्था जरा सुस्तावण्याची शक्यता असते. त्यामुळे या साथीतून पुन्हा उभारी घेऊ पाहणाऱ्या economiesसाठी हे पाऊल धोक्याचं ठरणार की काय, अशीही एक भीती आहे.
तर या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर सोधणार आहोत, की आत्ताची ही महागाई खरंच किती काळ राहील? तिला आळा घालायला सरकारांनी काही पावलं उचलावीत की नाही?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 8th January 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.