गोष्ट दुनियेची - भाग 15: पुढचं महायुद्ध अंतराळात होणार का? स्पेस वॉरची शक्यता किती? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भाग 15: पुढचं महायुद्ध अंतराळात होणार का? स्पेस वॉरची शक्यता किती? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भाग 15: पुढचं महायुद्ध अंतराळात होणार का? स्पेस वॉरची शक्यता किती? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

#BBCMarathi #SpaceMissions #Russia #US #गोष्टदुनियेची

1982मधे सोवियत संघाने कॉसमॉस-1408 नावांचं एक गोपनीय उपग्रह अंतराळांत लाँच केलं. पण दोनच वर्षात ते खराब झालं, आणि त्याच्या कक्षेत आजवर ते तसंच फिरत राहिलं. अखेर नोव्हेंबर 2021मध्ये रशियाने एक अँटी-सॅटलाइट मिसाइल लॉन्च करत याला नष्ट केलं. पण याचे जवळजवळ 1,500 तुकड़े अंतराळात पसरले. यापूर्वी अमेरिकेने 2008मध्ये आणि चीनने 2007मध्ये असंच केलं होतं.
पण रशियाने आता असं केल्यावर त्याच्यावर कडाडून टीका झाली, कारण या सॅटलाइटचे तुकडे कुठल्या एखाद्या अंतराळयानाला जाऊन धडकू शकतात किंवा एखाद्या उपग्रहात बिघाड आणू शकतात, ज्यामुळे मोठं नुकसान सोसावं लागलं असतं.
जाणकारांनुसार रशियाने हे करून दाखवून दिलंय की ते कुठल्याही कायद्याचं उल्लंघन न करता अंतराळात सॅटलाइट नष्ट करू शकतात. आत्ता त्यांनी त्यांचा स्वतःचा सॅटलाईट नष्ट केलाय, पण पुढच्या वेळेसही असंच होईल, असं नाहीय.

तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, की अंतराळात कुणी काय करावं, काय करू नये, याचे काही कायदे आहेत का?आणि जगभरातल्या देशांमध्ये आता स्पेस वॉर होऊ शकतं का?

संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 12th February 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.