गोष्ट दुनियेची - भाग 22: NFT म्हणजे नेमकं काय? क्रिप्टो जगात आपलं विश्व कसं बदलेल? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भाग 22: NFT म्हणजे नेमकं काय? क्रिप्टो जगात आपलं विश्व कसं बदलेल? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भाग 22: NFT म्हणजे नेमकं काय? क्रिप्टो जगात आपलं विश्व कसं बदलेल? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

2005 मध्ये झोई रॉस या पाच वर्षांच्या मुलीचा एक फोटो व्हायरल झाला. ती एका जळत्या घरासमोर उभी होती, आणि ती अशी हसत होती, जणुकाही ती आग तिनेच लावलीय किंवा तिला त्याचा आनंद झालाय. तिचा हा फोटो इतका व्हायरल झाला की तिचं मीमच बनलं – The Disaster Girl.
त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये त्याच फोटोची विक्री 4 लाख 73 हजार डॉलर्सना करण्यात आली, पण एक NFT म्हणून. NFT म्हणजे non fungible token – म्हणजे एकप्रकारे त्या फोटोच्या मालकीचं डिजिटल प्रमाणपत्र. पण तुमच्याकडे तो ओरिजिनल फोटो नाही, त्याची कॉपी करण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. आणि हे डिजिटल प्रमाणपत्र तुम्ही एखाद्या पेंटिंगसारखं तुमच्या हॉलमधल्या भिंतीवरही टांगू शकत नाही.

अशाच प्रकारे, जगातलं पहिलं वहिलं ट्वीटसुद्धा 29 लाख डॉलर्सना NFTच्या रूपात विकलं गेलं होतं. आणि इंद्रधनुष्याच्या रंगांच्या मांजरीचं एक चित्र चक्क 6 लाख 90 हजार डॉलर्सला विकलं गेलं होतं.
पण या काही जगात कुठेतरी क्वचितच घडलेल्या घटना नाहीत. NFTsचा बाजार मोठा होत चाललाय. आणि एका अंदाजानुसार एकट्या 2021 मध्ये 21 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीचे NFT व्यवहार जगभरात करण्यात आले. भारतातही असेच व्यवहार आता सिने आणि कलाक्षेत्रात होताना दिसतायत.

त्यामुळे पुढे चालून आपण डिजिटल विश्वात असाच पैसा खर्च करू का, असा प्रश्न विचारला जातोय. पण मुळात NFT असतं तरी काय? आणि खरंच याने आपलं डिजिटल विश्व बदलणार आहे का?

याच प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करणार आहोत, चार तज्ज्ञांबरोबर.

मूळ निर्मिती - द इंक्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 2nd April 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.