गोष्ट दुनियेची - भाग 26: इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी जगातली सर्वांत मोठी कार उत्पादक कशी बनली? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भाग 26: इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी जगातली सर्वांत मोठी कार उत्पादक कशी बनली? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भाग 26: इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी जगातली सर्वांत मोठी कार उत्पादक कशी बनली? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

या आठवड्यातली सर्वांत मोठी बातमी कदाचित हीच असेल, की इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतलंय. ट्विटर, ज्यावर 280 कॅरॅक्टर्समध्ये तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असतं. ते जगातलं सर्वांत मोठं तर नाही, पण नक्कीच सर्वांत जास्त प्रभाव टाकणारं सोशल मीडिया ॲप आहे.
कुठेही बाँबस्फोट झाला वा भूकंप, कुठे सरकार पडलं वा कुठली मोठी राजकीय उलाढाल झाली, पहिली बातमी इथेच फुटते, पहिल्या प्रतिक्रिया इथेच उमटतात. त्यामुळे अशा अवाढव्य पण तितक्याच वादग्रस्त प्लॅटफॉर्मला सुधारण्याचा बेत इलॉन मस्क यांचा आहे. हे वेगळ्याने सांगायला नको की यामुळे त्यांना जगावर एक वेगळीच छाप पाडण्याची आणखी एक संधी प्राप्त होताना दिसतेय.
यापूर्वीसुद्धा त्यांनी इलेक्ट्रिक कार टेस्ला बनवून सर्वच दिग्गज कार उत्पादकांना विद्युतीकरणाकडे वळायला भाग पाडलंय.
पण मुळात इलॉन मस्क कोण आहेत? टेस्ला, स्पेसएक्स, न्युरालिंक आणि द बोरिंग कंपनीसारख्या क्रांतिकारी स्टार्टअप्सचे जनक जगावर किती प्रभाव पाडत आहेत? आणि त्यांची टेस्ला ही कार कंपनी जगातली सर्वांत मोठी कंपनी कशी बनली?
जाणून घेणार आहोत, आपण या आठवड्याची गोष्ट दुनियेची ऐकताना.

संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - मानसी दाश
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 30th April 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.