गोष्ट दुनियेची - भाग 28: खरंच युरोप रशियाकडून गॅस विकत घेणं बंद करू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

भाग 28: खरंच युरोप रशियाकडून गॅस विकत घेणं बंद करू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download भाग 28: खरंच युरोप रशियाकडून गॅस विकत घेणं बंद करू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

नॉर्ड स्ट्रीम-1 – जगभरात चर्चेचा विषय असलेली ही पाइप लाईन बाल्टिक सागराच्या खालून जाणारा आणि रशियाला जर्मनीशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. कुणे एके काळी या पाईपलाईनला जर्मनी आणि रशियामधल्या विश्वासाच्या नात्याचं प्रतीक मानलं जायचं. रशियाहून येणाऱ्या या गॅसपासून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते. पण युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यापासून युरोप रशियावर संतापलाय आणि त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे युरोपियन युनियनने या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून गॅस खरेदी थांबवायचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयावर अद्याप सर्वच देशांचं एकमत नाहीय, त्यामुळेच आपण या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की खरंच युरोप रशियाकडून गॅस विकत घेणं बंद करू शकतो का?
या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करणार आहोत चार तज्ज्ञांबरोबर.

संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 14th May 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.