गोष्ट दुनियेची - गांजा (Cannabis / Marijuana) आता सहज मिळू शकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

गांजा (Cannabis / Marijuana) आता सहज मिळू शकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download गांजा (Cannabis / Marijuana) आता सहज मिळू शकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

जून 2022 मध्ये थायलंड दक्षिण पूर्व आशियातला पहिला देश बनला ज्याने गांजाच्या वापरावरची बंदी हटवली. गांजा, ज्याला Marijuana, Cannabis, Weed, Pot, Green, Hemp, अशा अनेक नावांनी ओळखलं जातं, त्याच्या घरगुती शेती आणि वापराला थायलंड सरकारने आता गुन्ह्यांच्या यादीतून बाहेर काढलंय. पण याचा वैयक्तिक वापर करू नका, असंही सरकारने म्हटलंय.

थायलंड प्रशासनाला आशा आहे की यामुळे स्थानिक गांजा उद्योगाला चालना मिळेल आणि पर्यटकही आकर्षक होतील.

काही काळापासून भारतातही आपण ड्रग्स, गांजा, narcotics control bureau सारखे शब्द बातम्यांमध्ये ऐकतोय. मात्र अमेरिकेसह जगभरातल्या अनेक देशांमध्ये गांजाच्या कायदेशीर वापराला, काही काही ठिकाणी वैद्यकीय उपचारांसाठीसुद्धा परवानगी दिली जातेय.

गांजाला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की यामुळे लोक व्यसनाधीन होत जातील आणि त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हे धोक्याचं आहे.
तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – की अनेक देश आता गांजाच्या वापराला परवानगी का देत आहेत? आणि भविष्यात आपल्याला गांजा अगदी सहज मिळू शकेल का?
या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली.

संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - मानसी दाश
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 23rd July 2022.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.