Download हेरगिरीच्या या जहाजामुळे भारत-चीन संबंध आणखी चिघळतील? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
चीनचं एक हेरगिरी करणारं जहाज मागचे काही दिवस श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात तैनात आहे. तिथं ते युद्धाभ्यास करणार आहे. पण, त्यामुळे भारताची चिंता मात्र वाढलीय. या जहाजात अत्याधुनिक रडार यंत्रणा आहे, ज्यामुळे चीन भारतीय क्षेपणास्त्रांची अचूकता आणि टप्पा यांचा माग काढू शकेल. आणि दुसरं म्हणजे चीन हंबनटोटा या लंकन बंदाराचा लष्करी कारवायांसाठी वापर करेल अशी भीती भारताला वाटतेय. तर चीन दक्षिण चिनी समुद्रात आपलं वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. ही एक धोक्याची घंटा आहे. भारत - चीन संबंध यामुळे बिघडू शकतील का? भारताने चीनला घाबरायला हवं का? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
Published on Saturday, 20th August 2022.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.