Download मानवी मृतदेहापासून खताची निर्मिती शक्य आहे का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
अमेरिकेत पारंपरिक अंत्यविधीला पर्याय म्हणून ह्युमन कंपोस्टिंग ही पद्धत नावारुपाला येत आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा वॉशिंग्टन राज्याने यासाठी मान्यता दिली होती. आतापर्यंत अमेरिकेच्या सहा राज्यांनी ह्युमन कंपोस्टिंगसाठी परवानगी दिली आहे. यामुळे मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीला आपल्या शवाचं रुपांतर मातीमध्ये किंवा खतामध्ये करण्याचा निर्णय घेता येऊ शकतो. ‘ह्युमन कंपोस्टिंग’मध्ये नैसर्गिक आणि सुरक्षित प्रक्रिया वापरून मृतदेहाचं रुपांतर मातीमध्ये करता येऊ शकतं असा दावा आहे. या प्रक्रियेला
नॅचरल ऑरगॅनिक रिडक्शन असंही म्हटलं जातं.
निवेदन - दीपाली जगताप
एडिटिंग- अरविंद पारेकर
Published on Wednesday, 4th January 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.