गोष्ट दुनियेची - राजे चार्ल्स तृतीय यांच्या नेतृत्त्वातलं कॉमनवेल्थ कसं असेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

राजे चार्ल्स तृतीय यांच्या नेतृत्त्वातलं कॉमनवेल्थ कसं असेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download राजे चार्ल्स तृतीय यांच्या नेतृत्त्वातलं कॉमनवेल्थ कसं असेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

सप्टेंबर 2022. राणी एलिझाबेथ द्वितिय यांचं निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर 24 तासांच्या आत किंग चार्ल्स तृतrय यांचं राजा म्हणून पहिलं भाषण टीव्हीवर प्रसारित झालं.

यासोबत राणींचे पुत्र हे ब्रिटिश कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल या 56 देशांच्या संघटनेचे प्रतीकात्मक प्रमुखही बनले. त्यातल्या 15 देशांचं राष्ट्रप्रमुखपदही चार्ल्स तृतीय यांच्याकडेच आलं आहे. पण यातल्या काही देशांना ब्रिटिश राजघराण्यासोबतचं नातं आता नको आहे.

कॉमनवेल्थ देशांमधल्या तरुणांना या राष्ट्रसंघटनेविषयी काय वाटतं, हाही प्रश्न आहे. भारतातही आपल्या देशानं या संघटनेतून बाहेर पडायला हवं, असा विचार अनेकदा मांडला जातो.
याच मुद्द्यावर आपण या आठवड्यातल्या गोष्ट दुनियेची मध्ये चर्चा करणार आहोत. राजे चार्ल्स तृतीय यांच्या नेतृत्त्वात कॉमनवेल्थचं भवितव्य काय असेल, याविषयी आम्ही काही तज्ज्ञांशी बातचीत केली.

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, आवाज - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 6th May 2023.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.