गोष्ट दुनियेची - एखादा गुन्हा घडण्याआधी कंप्युटर्स तो रोखू शकतात का? BBC News Marathi

एखादा गुन्हा घडण्याआधी कंप्युटर्स तो रोखू शकतात का? BBC News Marathi

Download एखादा गुन्हा घडण्याआधी कंप्युटर्स तो रोखू शकतात का? BBC News Marathi

28 मे २०२३, दिल्लीचा शाहबाद डेअरी परिसर. एका तरुणानं एका अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडियो व्हायरल झाला. त्यात तो तरूण त्या मुलीवर सपासप वार करताना दिसतोय आणि आसपास येजा करणाऱ्यांपैकी कोणी त्याला थांबवत नाही की पोलिसांना कळवत नाही. ही हत्या कोणी का रोखू शकलं नाही? असा प्रश्न लोक आता विचारतायत.

खरंतर गुन्हा घडत असताना किंवा तो घडण्याआधीच गुन्हेगाराला रोखण्याच्या घटना क्वचितच घडतात. पण एक नवं तंत्रज्ञान गुन्हा घडण्याआधीच त्याचं भाकित करू लागलं आहे. ते तंत्रज्ञान म्हणजेच प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग.

प्रेडिक्टिव्ह पोलिसिंगचा वापर अनेक देशांत होतो. भारतात दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणासारख्या राज्यांतले पोलिसही वापरू लागले आहेत. गोष्ट दुनियेचीमध्ये या भागात आपण त्याविषयीच जाणून घेऊयात. प्रश्न असाय की गुन्हा घडण्याआधी कंप्युटर्स तो रोखू शकतात का? जिथे हे तंत्रज्ञान वापरलं जातंय, तिथे अपराधांचं प्रमाण कमी झालंय का?

ऐका ही गोष्ट दुनियेची.

संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 3rd June 2023.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.