Download UPSC ची लॅटरल एन्ट्रीची जाहिरात वादात का अडकली? BBC News Marathi
UPSC च्या वेबसाईटवरची नोकऱ्यांसाठीची जाहिरात वादात सापडलीय. Joint Secretary म्हणजे सहसचिव, Director - संचालक आणि Deputy Secretary म्हणजे उप-सचिव पदासाठीच्या Lateral Entry म्हणजे थेट नियुक्तीसाठीची ही जाहिरात आहे. दिल्लीमधील विविध मंत्रालयं आणि खात्यांच्या मुख्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने या नेमणुका होतील. या नेमणुका 3 वर्षांच्या कालावधीसाठी असतील आणि हा काळ 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
या नेमणुका कशा होणार? किती पदं अशा प्रकारे भरली जाणार? या नोकऱ्यांमध्ये आरक्षण का नसणार? यावर विरोधी पक्षाने काय आक्षेप घेतला आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अभिजीत कांबळे
एडिटिंग - शरद बढे
Published on Tuesday, 20th August 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.