Download THAAD: US इस्रायलला अँटी-मिसाईल सिस्टिम का देतंय? | BBC News Marathi
1 ऑक्टोबरला इराणने इस्रायलवर 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं डागली होती. यातली बहुतेक आकाशातच नष्ट करण्यात आल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं होतं पण त्यातली अनेक मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये पडली. या हल्ल्याला अजून इस्रायलने प्रत्युत्तर दिलेलं नाही. आणि आता इस्रायलला त्यांची हवाई हल्ल्यांपासूनची सुरक्षा वाढवण्यासाठी High Altitude Anti - Missile System म्हणजे अधिक उंचीवरून येणारी क्षेपणास्त्रं रोखणारी यंत्रणा आणि त्यासाठीचं लष्करी पथक पुरवणार असल्याचं अमेरिकेने जाहीर केलंय. अमेरिकेने इस्रायलला दिलेली Thaad मिसाईल रोधक यंत्रणा काय आहे? अमेरिकेने आता इस्रायलला अशी यंत्रणा का पुरवली आहे?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले
Published on Wednesday, 16th October 2024.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.